छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी सोमवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या (Marathwada Liberation Day) मुख्य कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. क्रांती चौक येथील मुख्य व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच काही आंदोलकांनी घोषणा देत कार्यक्रमात गोंधळ घातला.

अचानक झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा. तसेच, कुणबी नोंदी देणाऱ्या व त्यात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती.

कार्यक्रमस्थळी झालेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आपण मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्येही काही लोक येऊन नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान असून शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

चारच माणसे येतात आणि नारेबाजी मिळून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. मी त्यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर हे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) राजधानी बनेल कारण ते एक आवडते गुंतवणूक ठिकाण आहे. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याचे भारतात एकीकरण आणि निजामाच्या राजवटीतील हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरणाचा वर्धापन दिन आहे.