जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रसंगावधनतेमुळे काही लोकांचा जीव वाचला आहे. यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचला आहे. तसंच, नागपुरातील एकाचा यात समावेश आहे.
कुटूंबियाची प्रतिक्रिया
पहेलगाम मध्ये काल फायरिंग झाली तेव्हा पाच जण तेथील हॉटेल मधेच होते. बुलढाण्यातली हे पाचजण हॉटेलबाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले.त्यांना सांगितले की, फायरिंग सुरु झाली आहे. बाहेर फिरायला पडू नका. बुलढाण्यातील पाच जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते. यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. पत्रकार अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असा समावेश आहेत. जेव्हा फायरिंग होत होती. तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता.
बुलढाण्यातील 5 जण अडकले
सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेल मध्येच आश्रयला आहे. एकूण 5 लोक आहेत. यामध्ये 2 महिला, 3 पुरुषांचा समावेश आहे.काश्मीरमध्ये अडकलेल्या या पाच जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत. ते 18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगामध्ये हॉटेलला आले. 22 ला सकाळी पहलगामध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
पहाडावरुन उड्या मारल्या
काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत आहे.