जेएनएन, वाशिम. Washim Rains: वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात पावसाचा मोठा फटका बसला असून नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

वनोजा आणि पिंजर गावाला जोडणारा रस्ता पूर्णतः बंद 

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळील लेंडी नाल्याला पूर आला आहे. यामुळे वनोजा आणि पिंजर गावाला जोडणारा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. वनोजा गाव, तांडा व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा देखील मुख्य संपर्क तुटला आहे. नागरिकांना आरोग्यसेवा आणि दैनंदिन गरजांसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

मेहकर–रिसोड मार्गावरील पूल जलमय

रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मेहकर–रिसोड मार्गावरील पूल जलमय झाला आहे.

NDRF व आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

    यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.काही नागरिक जीव धोक्यात टाकून पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून NDRF व आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत.

    तात्पुरती सुट्टी जाहीर 

    नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अती धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.शाळा, अंगणवाडी व काही कार्यालयांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.