जेएनएन, मुंबई. Raksha Bandhan Wishes 2026: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीच्या आयुष्यभर रक्षणाची आणि तिच्या सुख-दुःखात साथ देण्याची भावना व्यक्त करतो. त्यामुळे राखीचा धागा हा केवळ एक धागा नसून, प्रेम, विश्वास, माया आणि आयुष्यभराच्या नात्याचे प्रतीक मानला जातो.

रक्षाबंधनाच्या दिवशी घराघरांत ओवाळणीचे ताट सजवले जाते. राखी, कुंकू, अक्षता, मिठाई आणि औक्षणाच्या पारंपरिक विधींनी हा सण उत्साहात साजरा केला जातो. या खास दिवशी आपल्या भाऊ-बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे सुंदर संदेश शेअर करू शकता.

  • राखीचा धागा साधा असला, तरी त्यात माया, प्रेम आणि आयुष्यभराची साथ बांधलेली असते.
    भावा-बहिणीच्या या गोड नात्याला मनापासून सलाम!
    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • ओवाळणीचं ताट सजलं, राखीचा धागा हातात आला,
    बहिणीच्या प्रेमानं भावाचा चेहरा खुलल
    हे प्रेम असंच जन्मोजन्मी टिकून राहो.
    रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
  • घरच्या घरी केलेली मिठाई आणि हातावर बांधलेली प्रेमाची राखी…
    यापेक्षा सुंदर रक्षाबंधन काय असणार! 
    भाऊ-बहिणीच्या नात्याला मनापासून शुभेच्छा! 
  • राखीच्या धाग्यात बहिणीची माया, भावाच्या मनात बहिणीची काळजी…
    हे नातं असंच गोड, घट्ट आणि कायमचं राहो.
    रक्षाबंधनाच्या ढिगभर शुभेच्छा!
  • राखी बांधली हातात, आठवणी आल्या मनात,
    भाऊ-बहिणीचं नातं असंच राहो सदैव मनात!
    मायेनं भरलेलं हे नातं आयुष्यभर फुलत राहो.
    रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा! 
  • नाही सोन्याची राखी, नाही महागडी भेट,
    भाऊ-बहिणीच्या नात्यात असते फक्त प्रेमाचीच श्रीमंती!
    हे नातं जन्मोजन्मी असंच टिकून राहो.
    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • ओवाळणीचं ताट, घरात गोडधोडाची चव,
    मनात भावासाठी प्रेम आणि ओठांवर आशीर्वादाची ओढ…
    असं असतं आपलं रक्षाबंधन!
    भाऊ-बहिणीला राखी पौर्णिमेच्या ढिगभर शुभेच्छा! 
  • बालपणीच्या भांडणापासून ते आयुष्यभराच्या काळजीपर्यंत,
    भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेमाची अशी गोष्ट जी कधीच संपत नाही.
    या गोड नात्याला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

हेही वाचा: शनीच्या साडेसाती मुळे भाऊ त्रस्त आहे का? रक्षाबंधनाच्या दिवशी करा 'हे' काम, जीवनातील सर्व दुःखे होतील दूर