लाइफस्टाइल डेस्क, मुंबई : ऑक्टोबर 2026 हा सण-उत्सवांच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना ठरणार आहे. पितृपक्षाच्या समाप्तीपासून शारदीय नवरात्री, दुर्गाष्टमी, महानवमी आणि विजयादशमीपर्यंत अनेक महत्त्वाचे धार्मिक दिवस या महिन्यात येत आहेत. महाराष्ट्रात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि २० ऑक्टोबरला दसरा या सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांनी सुट्ट्यांचे नियोजन करताना या तारखा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने 2026 साठी जाहीर केलेल्या अधिकृत सार्वजनिक सुट्टीच्या यादीत या दोन्ही दिवसांचा समावेश आहे.

पितृपक्षाची सांगता, त्यानंतर नवरात्रीला सुरुवात
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पितृपक्षात होत आहे. 6 ऑक्टोबरला इंदिरा एकादशी, तर 10 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वपित्री अमावस्येनंतर पितृपक्षाची सांगता होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.

नवरात्रीच्या काळात घटस्थापना, दुर्गाष्टमी, महानवमी आणि विजयादशमी हे महत्त्वाचे दिवस असतील. 19 ऑक्टोबरला महाअष्टमी आणि महानवमी, तर 20 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील ऑक्टोबर 2026 मधील प्रमुख सण

तारीखवारसण / महत्त्वाचा दिवस
    २ ऑक्टोबर २०२६शुक्रवारमहात्मा गांधी जयंती
    ६ ऑक्टोबर २०२६मंगळवारइंदिरा एकादशी
    १० ऑक्टोबर २०२६शनिवारसर्वपित्री अमावस्या
    ११ ऑक्टोबर २०२६रविवारशारदीय नवरात्री प्रारंभ
    १९ ऑक्टोबर २०२६सोमवारमहाअष्टमी, महानवमी
    २० ऑक्टोबर २०२६मंगळवारविजयादशमी, दसरा
    २२ ऑक्टोबर २०२६गुरुवारपापांकुशा एकादशी
    २५ ऑक्टोबर २०२६रविवारशरद पौर्णिमा

    टीप : धार्मिक सणांच्या तिथी, पूजा मुहूर्त आणि चंद्रोदयाच्या वेळा शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे पूजा किंवा व्रतासाठी स्थानिक पंचांग तपासणे योग्य ठरेल.

    महाराष्ट्रात बँका कधी बंद राहणार?
    महाराष्ट्र शासनाच्या 2026 च्या सार्वजनिक सुट्टीच्या अधिकृत यादीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि 20 ऑक्टोबर (दसरा) या सार्वजनिक सुट्ट्या आहेत.

    याशिवाय बँकांना नियमित रविवार, तसेच दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बँक ग्राहकांनी पुढील दिवसांची नोंद ठेवणे आवश्यक आहे.

    २९ ऑक्टोबर २०२६गुरुवारकरवा चौथ / करक चतुर्थी
    तारीखवारबँक सुट्टी / कारण
    २ ऑक्टोबर २०२६शुक्रवारमहात्मा गांधी जयंती
    ४ ऑक्टोबर २०२६रविवारसाप्ताहिक सुट्टी
    १० ऑक्टोबर २०२६शनिवारदुसरा शनिवार
    ११ ऑक्टोबर २०२६रविवारसाप्ताहिक सुट्टी
    १८ ऑक्टोबर २०२६रविवारसाप्ताहिक सुट्टी
    २० ऑक्टोबर २०२६मंगळवारदसरा
    २४ ऑक्टोबर २०२६शनिवारचौथा शनिवार

    याचा अर्थ, महाराष्ट्रात बँकांचे व्यवहार नियोजित करताना या सुट्ट्यांचा विचार करावा लागेल. मात्र, बँकेची स्थानिक सुट्टी आणि शाखेच्या कामकाजाबाबत संबंधित बँकेची अधिकृत सूचना तपासणे महत्त्वाचे आहे.

    शाळांना किती सुट्ट्या?
    महाराष्ट्रातील शाळांच्या सुट्ट्या शिक्षण विभाग, मंडळ आणि संबंधित शाळेच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार ठरू शकतात. त्यामुळे सर्व शाळांसाठी एकसारख्या सुट्ट्या असतीलच असे नाही.

    मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि 20 ऑक्टोबरला दसरा या सुट्ट्या निश्चित आहेत.

    याशिवाय काही शाळा नवरात्री-दसरा किंवा स्थानिक परंपरांनुसार अतिरिक्त सुट्टी अथवा सुट्टीचा कालावधी जाहीर करू शकतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे अधिकृत परिपत्रक किंवा शाळेची वार्षिक दिनदर्शिका तपासणे आवश्यक आहे.

    करवा चौथची तारीख
    29 ऑक्टोबरला करवा चौथ आहे. महाराष्ट्रात या दिवशी याच तिथीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी देखील येते. करवा चौथ हा महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतात अधिक प्रचलित असला तरी महाराष्ट्रातही काही कुटुंबांमध्ये तो पाळला जातो. मुंबईसाठी 29 ऑक्टोबरला चंद्रोदय रात्री सुमारे ९ वाजता असल्याचे पंचांग गणनेत नमूद आहे.

    ऑक्टोबरमध्ये बँकेच्या सुट्ट्या 
    एकूणच, ऑक्टोबर 2026 मध्ये महाराष्ट्रात गांधी जयंती, सर्वपित्री अमावस्या, नवरात्री, महाअष्टमी, महानवमी आणि दसरा हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यासोबतच रविवार आणि बँकांच्या दुसऱ्या-चौथ्या शनिवारच्या सुट्ट्या आहेत. बँक कर्मचारी संघटनांनी 26 ऑक्टोबरपासून संपाची हाक दिल्याने महिन्याच्या अखेरीस बँकिंग व्यवहारांबाबत अतिरिक्त नियोजन करणे आवश्यक ठरू शकते. त्यामुळे बँकिंग व्यवहार, शाळेच्या सुट्ट्या किंवा प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित संस्था किंवा विभागाची ताजी सूचना तपासणे योग्य ठरेल.

    २५ ऑक्टोबर २०२६रविवारसाप्ताहिक सुट्टी