एजन्सी, जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरातील एका बेकायदेशीर बारमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन वर्षांच्या मुलासह किमान 11 जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

14 जण जखमी

तसेच, ओळख पटू न शकलेल्या तीन संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सॉल्सविले टाउनशिपमध्ये झालेल्या घटनेत आणखी 14 जण जखमी झाले, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेत बारमध्ये गोळीबार

स्थानिक पातळीवर 'शेबीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बारमध्ये गोळीबार झाला की बाहेर, हे पोलिसांनी सांगितले नाही. "मृत्यू झालेल्यांमध्ये तीन अल्पवयीन मुले आहेत, ज्यात 3 आणि 12 वर्षांची मुले (आणि एक) 16 वर्षांची मुलगी आहे," असे दक्षिण आफ्रिकन पोलिस सेवेने सांगितले. 

जगातील सर्वाधिक खून

    दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वाधिक खून होतात, सरासरी दररोज सुमारे 60 हत्या येथे होतात, अशी माहिती आहे.