नवी दिल्ली - अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मानवी अवशेष सापडले आहेत, असे यूएस कस्टम आणि सीमा संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. कवटीचे काही भाग आणि हाडे असलेले हे अवशेष अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळलेल्या बॅगेत आढळले.

सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, प्रवाशाने सुरुवातीला कस्टम्सला फक्त 10 सिगार असल्याचे जाहीर केले होते. तथापि, तपासणीदरम्यान, त्याच्याकडे बंदी घातलेली वनस्पती आणि इतर अघोषित वस्तू असल्याचे आढळून आले. प्रवाशाची ओळख आणि संभाव्य शुल्क अद्याप उघड झालेले नाही.

प्रवाशाने केला विचित्र युक्तिवाद-

सीबीपी फील्ड ऑपरेशन्स डायरेक्टर कार्लोस सी. मार्टेल म्हणाले की, कृषी तज्ञांनी बॅगमध्ये बंदी घातलेली वनस्पती असल्याचे ओळखले. तथापि, अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्यांना फॉइलमध्ये गुंडाळलेल्या डफेल बॅगमध्ये मानवी कवटी आणि हाडे आढळली. सर्वात धक्कादायक म्हणजे, प्रवाशाने दावा केला की तो धार्मिक विधींसाठी हे अवशेष घेऊन जात होता.

फोटो आले समोर -

मार्टेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर फोटो शेअर केले. त्यात लिहिले होते, "विमानतळावर एका प्रवाशाने फक्त 10 सिगार घोषित केल्यापासून जे सुरू झाले ते विचित्र होते. सीबीसी कृषी तज्ञांना बंदी घातलेला वनस्पती, अघोषित सिगार आणि फॉइलने गुंडाळलेली डफेल बॅग सापडली ज्यामध्ये मानवी अवशेष असल्याचे दिसून आले, ज्यामध्ये कवटीचा भाग देखील समाविष्ट आहे.

    अहवालांनुसार, गंभीर सार्वजनिक आरोग्य धोक्यांमुळे अवशेष ताबडतोब नष्ट करण्यात आले. दरम्यान, अधिकारी देशात हाडे कशी आली याचा तपास करत आहेत. इतर दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे.

    हे ही वाचा - H-1B व्हिसा आता 90 लाख रुपयांना… ट्रम्पच्या एका निर्णयामुळे भारतीयांसाठी निर्माण झाल्या समस्या