जेएनएन, मुंबई. Actor Bharat Jadhav: मराठी रंगभूमीवरील एक यशस्वी नाव म्हणजे 'भरत जाधव' भरतने एका पेक्षा एका नाटकातून आपले अभिनय कौशल्य दाखवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला आह. गेली अनेक दशके भरत मराठी रंगभूमीवर चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उत्कृष्ट पद्धतीने काम करतोय. भरत जाधव हे नाव चित्रपट, मालिका पेक्षा जास्त त्याच्या नाटकातील अभिनय आणि भूमिकांसाठी ओळखल्या जाते. भरत जाधवची प्रमुख भूमिका असलेलं काही नाटक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. भरत जाधवला नाटकाचा बादशाह म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. भरत १२ डिसेंबर रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या या नाट्यप्रवासाविषयी... 

'ऑल द बेस्ट'ने सुरुवात!

भरतच्या अभिनयक्षेत्राला सुरवात झाली ती एकांकिकांमधून त्यांनतर त्याने अनेक नाट्कांधून दमदार अभिनय केला पण, भरत जाधवला खरी ओळख मिळाली ते म्हणजे, २००३ साली आलेल्या 'ऑल द बेस्ट' या नाटकातून भरतला रंगभूमीवर खरी ओळख मिळाली व तो प्रसिद्धीस आला. या नाटकात भरत सोबत अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांनीही भूमिका साकारल्या. 'ऑल द बेस्ट' या नाटकाचे ३००० प्रयोग पूर्ण झाले आहे. 

लक्ष्मीकांत बेर्डेसाठी लिहिलेले नाटक मिळाले भरतला

रंगभूमीवर गाजलेले नाटक म्हणजे 'सही रे सही' नाटकात भरतने चार भूमिका साकारल्या आहे. गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अश्या भूमिका साकारल्या. या नाटकाचे आतापर्यंत ४४४४ प्रयोग पूर्ण झाले आहेत. असे सांगितले जाते की, सही रे सही हे नाटक केदार जाधवने विनोदी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी लिहिले होते. पण नंतर हे नाटकसाठी केदारने भरत जाधवची निवड केली. 

गिनीजबुकसह भरतच्या नावावर आहेत हे विक्रम

    'सही रे सही' या  नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले असून, या नाटकाने  गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले आहे. गिनीजबुकसह भरतच्या नावावरही काही विक्रम आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे. सही रे सही या नाटकाचे गुजराती आणि हिंदी नाटकात देखील रूपांतर झाले आहे. सही रे सहीच्या गुजराती नाटकात शर्मन जोशी तर हिंदीत जावेद जाफरीने भूमिका साकारली आहे. 

    ८ हजारांवर नाटकं आणि ८५ वर चित्रपटाचा बादशहा ‘भरत’

    भरत जाधवने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकात काम केले आहे. जत्रा, साडे माडे तीन, बाप रे बाप, पछाडलेला हे चित्रपट आणि त्यातल्या भरतच्या भूमिका विशेष गाजल्या. भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट , ८ मालिका आणि ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. भरत जाधवने २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची सुरवात केली.