जेएनएन, मुंबई.Tumbadchi Manjula Box Office Collection: सामाजिक भयपट आणि विनोदाचा अनोखा संगम असलेला मराठी चित्रपट 'तुंबाडची मंजुळा' प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. 5 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात दमदार कामगिरी करत पाच दिवसांत 4.67 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे.

रहस्य, भीती, अफवा आणि ग्रामीण जीवनातील रंगतदार घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने जगभरात 4.45 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन नोंदवले आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण कमाई भारतातून झाली असून परदेशातील कमाई अद्याप शून्यावर आहे. पहिल्या पाच दिवसांत चित्रपटाचे एकूण 2,519 शो प्रदर्शित करण्यात आले.

कमाईच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने 54 लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 98 लाख आणि रविवारी तब्बल 1.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवत चित्रपटाने मोठी झेप घेतली. रविवारी प्रेक्षकांची उपस्थिती 58 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही दिसून आले. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी अनुक्रमे 70 लाख आणि 72 लाख रुपयांची कमाई झाली.

बॉक्स ऑफिस विश्लेषकांच्या मते, विकेंडमध्ये मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती प्रेक्षकसंख्या लक्षात घेता आगामी दिवसांतही चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर उभे राहिलेले गूढ वातावरण, भयपटातील थरार आणि विनोदाची फोडणी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.


'तुंबाडची मंजुळा' बॉक्स ऑफिस कलेक्शन (पहिले 5 दिवस) 

चित्रपटाबद्दल
चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगावकर यांनी केले असून कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. मयूर हरदास यांनी चित्रपटाचे संपादन केले आहे.

    चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, गणेश पंडित, उषा नाडकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटातील रहस्य, भीती आणि विनोद अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत प्रेक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.

    ग्रामीण संस्कृती, गूढ कथा आणि मनोरंजनाचा संगम असलेला 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरत आहे.

    हेही वाचा: 'मंगल'मुळे अक्षय कुमारची टीम जंगलात अडकली; 'Welcome To The Jungle'चा ट्रेलर या दिवशी 

    दिवसकमाई (कोटी रुपये)
    पहिला दिवस₹०.५४ कोटी
    दुसरा दिवस₹०.९८ कोटी
    तिसरा दिवस₹१.७३ कोटी
    चौथा दिवस₹०.७० कोटी
    पाचवा दिवस₹०.७२ कोटी
    भारतातील एकूण निव्वळ कमाई₹४.६७ कोटी