जेएनएन, मुंबई: मराठी कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात मराठी मनोरंजनसृष्टीचा ठसा उमटवत आहेत. अशातच अभिनेता पृथ्वीक प्रताप याने न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परदेशात जाऊनही आपली संस्कृती, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा अभिमान त्याने व्यक्त केला आहे.

टाइम्स स्क्वेअरमध्ये पृथ्वीकचा मराठमोळा रुबाब!
अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमधील काही खास क्षण शेअर केले आहेत. यावेळी त्याचा मराठमोळा अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परदेशातील प्रसिद्ध ठिकाणी आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही केला.

या फोटोंसोबत पृथ्वीकने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, "जेव्हा पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरला गेलेलो, तेव्हा आईच्या साडीचा कुर्ता घातलेला. पण या वेळेस माझ्या राजांना, माझ्या संस्कृतीला सातासमुद्रापार अभिमानाने मिरवून आलोय."

मराठी मातीचा अभिमान सातासमुद्रापार पोहोचवण्याचा निर्धार
पृथ्वीकने आपल्या पोस्टमधून केवळ परदेशातील अनुभव शेअर केला नाही, तर मराठी संस्कृती आणि अस्मितेविषयीचे प्रेमही व्यक्त केले आहे. आपल्या कामातून मराठीचा डंका जगभरात गाजवण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत राहीन, असा निर्धार त्याने व्यक्त केला.

तसेच आपल्या मराठी मातीचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष संपूर्ण जगात करत राहणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

आपल्या पोस्टच्या शेवटी पृथ्वीकने 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' आणि 'जय महाराष्ट्र!' असा नारा दिला आहे.

    चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
    पृथ्वीकच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असून त्याच्या मराठमोळ्या अंदाजाचे चाहते कौतुक करत आहेत. परदेशात जाऊनही आपली संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ जपणाऱ्या पृथ्वीकच्या भूमिकेचे अनेकजण स्वागत करत आहेत.

    दरम्यान, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये मराठी संस्कृतीचा अभिमानाने उल्लेख करत पृथ्वीकने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

    हेही वाचा: प्रीमियरला नाही, सामान्य प्रेक्षकांसोबत पाहायचा होता सिनेमा! पत्नीच्या आग्रहाखातर संकर्षण कऱ्हाडेने पाहिला ‘आदि-अनंत’