जेएनएन, मुंबई: आज देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाची घरोघरी स्थापना केली आहे. पुढील दहा दिवस, म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तिभावाने बाप्पाची पूजा-अर्चना केली जाणार असून, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली जात आहे. काही घरांमध्ये दीड दिवस, तर काही ठिकाणी पाच आणि दहा दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते.

गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच घरांमध्ये आकर्षक सजावट आणि सुंदर देखावे साकारले जातात. बाप्पाच्या स्वागतासाठी करण्यात आलेली ही सजावट गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरते. सर्वसामान्यांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केले आहे.

मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन
अभिनेते स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिव ठाकरे तसेच अभिनेत्री सायली संजीव, रुपाली भोसले यांच्यासह अनेक मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. कलाकारांनी आपल्या घरातील बाप्पाच्या स्थापनेचे आणि सजावटीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले असून, जेनेलिया देशमुखने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री सायली संजीवने देखील घरी बाप्पाची स्थापना केली आहे.

अभिनेता सुबोध भावेंच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले असून, सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले, आज गणरायाचं आगमन झालय,आपल्या सर्वाना तो उत्तम आयुष्य, आरोग्य, शांती, समाधान, आनंद देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना 🙏
यंदा प्रथमच आमच्या बाप्पाची मूर्ती मुलांनी घडवली आहे. देखावा देखील त्यांची कल्पना.
समाज माध्यमांची सुरवात लोकांनी एकत्र यावं म्हणून झाली पण आज त्याचा वापर शस्त्रासारखा एकमेकांना जखमी करण्यासाठी केला जातो. त्यातून बाहेर पडायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, एकमेकांना समजून घ्यायचं असेल तर अभ्यासाला अर्थात पुस्तकांना पर्याय नाही.
ज्ञान हाच बाप्पा कडे जाण्याचा मार्ग ही आहे.
हेच या देखाव्यात सांगण्याचा मुलांचा प्रयत्न. मंगलमूर्ती मोरया

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील घरी बाप्पाची स्थापना केली असून, कुटुंबासोबत बापाचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहे.

    अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी बापाचे आगमन झाले असून, अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केले आहे.

    अभिनेता शिव ठाकरेंच्या घरी देखील गणरायाची स्थापना केली जाते. ज्याचो तयारी करतानाचे अनेक फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

    टीव्ही अभिनेत्री रुपाली भोसलेने देखील तिच्या घरच्या बापाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.