जेएनएन, मुंबई. अखेरचा क्षण आला – बिग बॉस मराठीचा 6 (Big Boss Marathi 6) वा सिझन सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी दमदार एन्ट्री घेत प्रेक्षकांची मने जिंकली. सिझन सुरू होण्याआधीच कोणते स्पर्धक सहभागी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, आणि काल या रहस्याचा पर्दाफाश झाला.

बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशीच काही अप्रतिम आणि थरारक क्षण पाहायला मिळाले. काही स्पर्धकांनी अजब मागण्या केल्या, तर काहींनी एकमेकांवर टीका केली आणि कोणी एकमेकांना इंप्रेस करण्याचा प्रयत्नही केला.

स्पर्धकांची एन्ट्री

या सिझनमध्ये सागर कारंडे, दिपाली सय्यद, सचिन कुमावत, सोनाली राऊत, तन्वी कोलते, आयुष संजीव, रुचिता जामदार, करण सोनावणे, अनुश्री माने, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, राकेश बापट, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटीयन या स्पर्धकांनी घरात प्रवेश केला.

प्रभू शेळकेची अजब मागणी

पहिल्याच दिवशी प्रभू शेळकेने, ज्यांना ‘कालू डॉन’ म्हणून ओळखले जाते, घरात येताच चहासाठी साखर पाठवण्याची मागणी केली. या विनोदी मागणीने स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.


सचिन कुमावतचा सोनालीवर इंप्रेशन

गायक सचिन कुमावतने त्याच्या ओळखीनुसार अहिराणी भाषेतील गाण्याने स्पर्धक सोनालीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्याने सोनालीसाठी त्याचे व्हायरल झालेले गाणे ‘रस प्याले ये म्हणलं माय’ गायले. सोनालीने त्यावर साधीशी प्रतिक्रिया दिली, तर दीपाली सद्द मात्र सचिनच्या या गाण्यावर चांगलीच इंप्रेस झाली.

बिग बॉसच्या घरात नेहमीच वाद घडतात आणि पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वी यांच्यात वाद झाला. एका शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादात रुचिताने तन्वीला “तुझं तोंड शेणात घाल” असे शब्द दिले, ज्यामुळे घरात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली.


    पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस घरात थरार आणि मनोरंजनाची कमतरता नाही, आणि प्रेक्षकांसाठी येत्या आठवड्यांमध्ये अजूनही अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

    हेही वाचा: Shiv Thakare Wedding: बिग बॉसफेम शिव ठाकरे अडकला लग्नबंधनात? ‘Finally…’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा