जेएनएन, मुंबई: मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. “CJP (कॉक्रोच जनता पार्टी)” या शब्दप्रयोगाचा वापर करत त्यांनी समाजातील आणि राजकीय वातावरणातील प्रतिक्रियांवर उपरोधिक भाष्य केले आहे. त्यांच्या पोस्टमधील ‘थर्मोमीटर’चे उदाहरण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अतुल कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “अंगाला हात लावून ताप आहे असं वाटतं, पण थर्मोमीटर लावल्यावरच खरी स्थिती कळते. CJP नं थर्मोमीटरचं काम केलंय.” पुढे त्यांनी स्पष्ट केले की, थर्मोमीटरच डॉक्टर किंवा इलाज नसतो. एखादी गोष्ट वास्तव दाखवत असेल, तर ती नाकारण्याऐवजी त्यावर दुसरे मत घेणे अधिक शहाणपणाचे ठरते, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला.

त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या मताचे समर्थन करत वास्तव मांडण्याचे धाडस असल्याचे म्हटले, तर काहींनी या पोस्टवर टीकाही केली. “थर्मोमीटर चुकीचं तापमान दाखवतंय असं वाटत असेल तर सेकंड, थर्ड ओपिनियन घ्या,” या ओळी विशेष चर्चेत आल्या आहेत.
कॉकरोच जनता पार्टी
कॉकरोचजनता पार्टी (CJP) म्हणजे “Cockroach Janta Party” हा 2026 मध्ये सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेला एक डिजिटल आंदोलन/मोहीम आहे. याची सुरुवात अभिजित दीपके यांनी केली. या मोहिमेची चर्चा तेव्हा वाढली, जेव्हा बेरोजगार तरुणांबाबत “कॉक्रोच” असा उल्लेख झाल्याच्या वादानंतर अनेक युवकांनी त्याच शब्दाला प्रतिकाराचे प्रतीक बनवले. “Main Bhi Cockroach” हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला. सोशल मीडियावर CJP ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनीही त्याला फॉलो किंवा समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: “हिंदीत चमकलं म्हणजेच मोठं नाही”; हिंदी इंडस्ट्रीबाबत वैभव मांगले यांचे परखड मत
