जेएनएन, नवी दिल्ली. Akshay Kumar Daughter : शुक्रवारी मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना इयत्ता 7 वी ते10  वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक सायबर गुन्ह्यांचा पीरियड सुरू करण्याची विनंती केली. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकण्यासाठी अभिनेत्याने आपल्या मुलीशी संबंधित एका घटनेचा उल्लेख केला. तो म्हणाला की सायबर गुन्ह्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी शाळेत त्याबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.

अक्षयने केला मोठा खुलासा -

राज्य पोलिस मुख्यालयात सायबर जागरूकता महिना 2025 च्या उद्घाटन समारंभात, अक्षय कुमारने या धोक्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्याच्या मुलीशी संबंधित एक धक्कादायक घटना शेअर केली. अक्षय म्हणाला, काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी घडलेली एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझी मुलगी (akshay kumar daughter) व्हिडिओ गेम खेळत होती आणि असे काही व्हिडिओ गेम आहेत जे तुम्ही कोणासोबतही खेळू शकता. जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा कधीकधी तिथून एक संदेश येतो. सुरुवातीला सामान्य मेसेज येत होते, जसे वेल प्लेड, थँक्यु, छान खेळलीस. त्यानंतर तिला विचारण्यात आले की, तू मेल आहेस की फिमेल? इथंपर्यंत ठीक होतं माझ्या मुलीने त्याला उत्तर दिले फिमेल. त्यानंतर त्या व्यक्तीने तिला विचारले तुझे न्यूड फोटो पाठवतेस का? माझ्या मुलीने लगेच गेम बंद केला आणि माझ्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. अशा प्रकारे या घटना सुरू होतात. हा देखील सायबर गुन्ह्याचा एक भाग आहे. ही घटना आमच्यासाठी एक धडा बनली. माझ्या मुलीने लगेच ही घटना तिच्या आईला सांगितले हे बरे झाले.

अक्षय कुमारचे सरकारला आवाहन -

अक्षय कुमारने मुलांना ऑनलाइन गुन्हेगारांबद्दल आणि धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिक्षित करण्याची तातडीची गरज यावर भर दिला. शाळांमध्ये सायबर गुन्ह्यांचा तास सुरू करण्याची मागणी केली. नवीन पिढीला डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक गोष्टी शिकवण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये दर आठवड्याला सायबर गुन्ह्यांचा पीरियड सुरू करण्याची मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, असे अभिनेता म्हणाला.

अक्षय सध्या "जॉली एलएलबी 3" मध्ये दिसत आहे, ज्यात अर्शद वारसी, हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला, गजेंद्र राव, राम कपूर आणि इतर कलाकार आहेत. तो दिग्दर्शक प्रियदर्शनच्या ॲक्शन-थ्रिलर "हैवान" साठी देखील शूटिंग करत आहे, ज्यामध्ये सैफ अली खान आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत.