जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 938 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 (MPSC Group C Joint Preliminary Exam 2025) द्वारे होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आजपासून (7 ऑक्टोबर) अर्ज करता येणार आहे. येत्या 4 जानेवारी रोजी राज्यातील 37 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा?
एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 ची जाहिरात 6 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीनुसार उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा, तांत्रिक सहायक पदाच्या 4, कर सहायक पदाच्या 73, तर लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागा भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा - Police Bharti 2025: कॉन्स्टेबल आणि जेल वॉर्डरच्या 4128 पदांवर होणार भरती, उद्यापासून अर्ज सुरू होणार
अर्ज भरण्याची तारीख
त्यासाठी उमेदवारांना 7 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी 29 ऑक्टोबर, तर परीक्षा शुल्क बँकेत भरण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
- लिपिक टंकलेखक - 852
- कर सहायक - 73
- तांत्रिक सहाय्यक - 04
- उद्योग निरीक्षक - 09
- एकूण जागा 938
- अर्ज करण्याचा कालावधी - 07 ते 27 ऑक्टोबर 2025
- परीक्षा दिनांक - 04 जानेवारी 2026
जाहिरात तुम्ही सविस्तर इथे पाहु शकता..
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/E5IKjD9iHD
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 6, 2025