जेएनएन, मुंबई. Maharashtra Board SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि. 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी दिली आहे.

10 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर 

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली. 

2026 च्या दहावीच्या निकालाची वेळ (When Will Class 10 Results Out)

  • 10 वीचा निकाल (SSC result Declared on 8 May): 8 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहावा (10th Result 2026)

  1. https://results.digilocker.gov.in 
  2. https://mahahsscboard.in 
  3. https://sscresult.mkcl.org 
  4. https://results.targetpublications.org 
  5. https://results.navneet.com

दहावीचा कसा पाहायचा निकाल?

    • निकाल जाहीर झाल्यावर तो https://results.digilocker.gov.in आणि https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल.
    •  विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. 
    • त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
    • विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
    • बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.

    4 सोप्या स्टेप मध्ये तपासा निकाल (how to check 10th Result)

    • स्टेप 1: महाराष्ट्र बोर्ड निकाल 2026 इयत्ता 10 वी तपासण्यासाठी, सर्वप्रथम mahahsscboard.in किंवा sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
    • स्टेप 2: यानंतर तुम्हाला 'View SSC Result' च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
    • स्टेप 3: आता तुम्हाला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून सबमिट करावे लागेल.
    • स्टेप 4: एकदा माहिती सादर झाल्यावर, निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो तपासू शकता तसेच डाउनलोड करू शकता.

    हेही वाचा - 10th Result 2026: दहावीचा निकाल 8 मे रोजी; आयोगाने जाहीर केली तारीख, असा पाहा निकाल