जेएनएन, मुंबई. भारतीय शेअर बाजाराला ऑक्टोबर 2025 मध्ये तीन दिवस सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही शनिवार आणि रविवारसह 11 दिवस बंद राहतील.
ट्रेडिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार तीन दिवस सुट्टी
एनएसई आणि बीएसईने जारी केलेल्या अधिकृत ट्रेडिंग हॉलिडे कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये बाजार तीन दिवस बंद राहतील, दिवाळीला विशेष मुहुर्तात ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल.
लक्ष्मी पूजनामुळे व्यापार सुट्टी
21 ऑक्टोबर 2025, मंगळवार दिवाळी लक्ष्मी पूजनामुळे व्यापार सुट्टी असेल. त्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केले जाईल. मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा नंतर एका परिपत्रकाद्वारे सूचित केल्या जातील, असं एनएसई आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
ऑक्टोबर मध्ये शेअर बाजार कधी बंद राहणार?
- महात्मा गांधी जयंती आणि दसरा हा 2 ऑक्टोबर रोजी आहे. त्या दिवशी BSE आणि NSE दोन्ही वरील व्यवहार बंद राहतील.
- त्यानंतर 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी BSE आणि NSE दोन्ही वरील व्यवहार बंद राहतील. मात्र, त्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केले जाईल. मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा नंतर एका परिपत्रकाद्वारे सूचित केल्या जातील, असं एनएसई आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
- 22 ऑक्टोबर 2025 बलिप्रतिपदा आहे. या दिवशी BSE आणि NSE दोन्ही वरील व्यवहार बंद राहतील.

हेही वाचा - October Bank Holidays List: ऑक्टोबरमध्ये बँकांना 14 दिवस सुट्ट्या, पहा संपूर्ण यादी