मुंबई. Gold Silver Price Today 22 April:  इराण-अमेरिका व इस्त्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या किमतीत सतत चढउतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याचा वायदा भाव मंगळवार सायंकाळपर्यंत 0.13% म्हणजेच 202 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,53,741 रुपयांवर आला, तर आदल्या दिवशी तो प्रति 10 ग्रॅम 1,53,943 रुपयांवर बंद झाला होता.

अमेरिका-इराण मधील सीजफायरचा आज शेवटचा दिवस असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत शस्त्रसंधी आणखी काही काळ वाढवण्याची घोषणी कली. ट्रम्प यांनी युद्धविरामाला मुदतवाढ देताच सोने-चांदीच्या दरातही प्रचंड उसळी पाहायला मिळाली.

आज (बुधवार 22 एप्रिल) सकाळी सोनं-चांदीला झळाली आली. सकाळी 9:15 वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या दरात जवळपास 1 % वाढ झाली. 5 जून, 2026 रोजी मुदत संपणाऱ्या कराराचा भाव वाढून 1,53,126 रुपयांवर पोहोचला. तसेच चांदीच्या दरातही 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या वाढीनंतर, 5 जून 2026 रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या कराराने 2,48,663 रुपयांचा टप्पा ओलांडला.

Silver Rate Today: चांदी कितीने महागली?

किरकोळ बाजारात चांदीच्या दरात सुमारे 4 हजार रुपयांनी तर सोनं सुमारे 1, 600 रुपयांनी महाग झालं आहे. असं असलं तरीही, आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत.

Gold Silver Price: काय पुन्हा महागणार सोने-चांदी?

    सलग दोन दिवस सोने-चांदी दरात घसरण झाल्यानतर आज पुन्हा एकदा सोने दराने उसळी घेतली आहे. सकाळी 8.40 वाजता कॉमेक्समध्ये सोने-चांदी दरात तेजी दिसून येत आहे. यावेळी सोने दरात 51.70 डॉलर प्रति औंसची तेजी आणि चांदीत 1.297 डॉलर प्रति औंसची वाढ दिसत आहे. सकाळी 8.43 वाजता कॉमेक्समध्ये चांदीचे दर 77.785 डॉलर प्रति औंस आणि सोन्याचा भाव 4771.30 डॉलर प्रति औंस होता.