नवी दिल्ली. Gold Silver Price Today : सोमवार, 8 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमतीत थोडी घसरण नोंदली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. पण आज सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 563 रुपयांची घसरण झाली आहे.

त्याच वेळी,1 किलो चांदीमध्ये 1019 रुपयांची घसरण दिसून आली आहे. सोने आणि चांदीचा सध्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊया.

Gold Price Today: सोन्याचा भाव कितीवर पोहोचला?

सकाळी 10 वाजता, एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 107174 प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला. सोन्यात 554 ची घसरण झाली आहे. सोन्याने आतापर्यंत 107,456 प्रति 10 ग्रॅमचा नीचांकी विक्रम आणि 107,695 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक नोंदवला आहे.

Silver Price Today: चांदीचा भाव कितीवर पोहोचला?

सकाळी 10 वाजता, एमसीएक्समध्ये चांदीचा भाव 123,773 रुपये प्रति किलो नोंदवला गेला. चांदीमध्ये 1110 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीने 123,572 रुपये प्रति किलोचा नीचांकी आणि 126400 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.

    राज्यातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर -

    (24 कॅरेटचे प्रति तोळा दर)

    मुंबई - 107,400

    पुणे - 107,400

    नागपूर -107,400

    नाशिक -107, 400