मुंबई. Gold and Silver Price Today: घसरणीनंतर, सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चांदीचे दर सध्या प्रति किलोग्रॅम ₹9,000 च्या वर तेजीत आहेत. सोन्याच्या किमतीतही प्रति 10 ग्रॅम ₹1,800 पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तथापि, काल सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली होती.
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेत तणावाची स्थिती आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावरच परिणाम झालेला दिसत आहे. इंधन व गॅस तुटवड्यानंतर आता सोनं आणि चांदीच्या दरातही अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन दिवसांच्या गसरणीनंतर सोने व चांदीच्या दरात तेजी आली आहे. युद्धाची स्थिती जर अशीच कायम राहिली तर येत्या काळात सोनं आणखी नवा उच्चांक गाठू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Silver Price Today: चांदीचा भाव किती आहे?
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चांदीच्या किमतीत प्रति किलो 9184 रुपयांची वाढ झाली. सध्या 1 किलो चांदीची किंमत 2,76,344 रुपये आहे. चांदीने आतापर्यंत प्रति किलो 2,71,000 रुपयांचा नीचांक आणि प्रति किलो 2,78,339 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
Gold Price Today: सोन्याचा भाव किती?
सकाळी 10 वाजता, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,122 रुपये झाला, जो प्रति 10 ग्रॅम 1823 रुपयांनी वाढला आहे. सोन्याने आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 1,61,452 रुपयांचा नीचांक आणि प्रति10 ग्रॅम 1,62,149 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
तुमच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीची किंमत किती आहे?
| शहर | सोन्याचा दर | चांदीची किंमत |
| मुंबई | ₹162,520 | ₹277,460 |
| पुणे | ₹162,520 | ₹277,460 |
| नागपूर | ₹162,520 | ₹277,460 |
| नाशिक | ₹162,520 | ₹277,460 |
| कोल्हापूर | ₹162,520 | ₹277,460 |
| छत्रपती संभाजीनगर | ₹162,520 | ₹277,460 |
| पणजी | ₹162,560 | ₹277,540 |
| हैदराबाद | ₹162,770 | ₹277,900 |
| कल्याण | 162,520 | 277,460 |
| ठाणे | 162,520 | 277,460 |
