जेएनएन, नवी दिल्ली: Budget Highlights 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत. आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पाचा सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होणार आहे. ते जाणून घेऊया…
काय स्वस्त होणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्करोग आणि मधुमेहावरील औषघं स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन आणि ईव्ही बॅटरीही स्वस्त होऊ शकतात.
- देशात तयार होणारी कपडे
- कर्करोग, मधुमेहावरील औषधं
- वैद्यकीय उपकरणे क्रीडा साहित्य
- मोबाईल फोन
- अपघात विमा
- लिथियम आयन बॅटरी
- दुचाकी
- एलसीडी, एलईडी
- सौर पॅनेल
- ईव्ही वाहने, ईव्ही बॅटरी
- फ्रोझन फूड
- 7 गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त होतील.
- कर्करोगाच्या 17 औषधांची किंमत कमी होईल.
- मधुमेहाची औषधे स्वस्त होतील.
- परदेशी प्रवास पूर्वीपेक्षा स्वस्त होईल.
- सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होतील.
काय महाग?
- दारु
- दुर्मिळ खनिजे
- बूट
- PVC flex sheet
- कमी किमतीच्या आयात केलेल्या छत्र्या
- पोटॅशियम हायड्रॉक्साईड
- एटीएम किंवा कॅश डिस्पेंसर मशीन आणि त्यांचे भाग आणि घटक
- परदेशी कर्मचाऱ्यांसाठी चित्रपट आणि प्रसारण उपकरणे
- प्राणीसंग्रहालयांसाठी आयात केलेले प्राणी आणि पक्षी
- अमोनियम फॉस्फेट किंवा नायट्रो-फॉस्फेट खते आणि नॅफ्था खते
- कॉफी भाजणे, ब्रूइंग करणे किंवा व्हेंडिंग मशीन
- एरंडेल तेल केक
हेही वाचा - Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
