भारतामध्ये इलेक्ट्रिक दोन-चाकी वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढतेय. आधी लोक विचारायचे – “एकदा चार्ज करून किती किलोमीटर जाईल?” पण आता लोकांचा मुख्य प्रश्न बदललाय – “ही बॅटरी किती वर्षे टिकेल?”

या प्रश्नाचं खरं उत्तर आहे बॅटरी, कारण तीच इलेक्ट्रिक वाहनाचं हृदय आहे. सध्या स्कूटर्समध्ये दोन बॅटरी तंत्रज्ञानं वापरली जातात – NMC (निकेल मॅंगनीज कोबाल्ट) आणि LFP (लिथियम आयर्न फॉस्फेट). दोन्हींचे काही फायदे-तोटे आहेत. मात्र कोणती बॅटरी निवडली जाते, यावर वाहनाचं आयुष्य अवलंबून असतं.काही कंपन्या आता LFP बॅटरी वापरू लागल्या आहेत. याच कारणामुळे सुझुकी (Suzuki) ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर सुझुकी ई-अ‍ॅक्सेस (Suzuki e-ACCESS) मध्ये ही तंत्रज्ञान वापरलं आहे. चला, पाहू या तिची वैशिष्ट्यं.

LFP बॅटरी म्हणजे काय? NMC पासून वेगळी कशी?
  1. जास्त आयुष्यNMC बॅटरीच्या तुलनेत LFP बॅटरीचं आयुष्य दोन ते तीनपट जास्त असतं.
  2. अधिक सुरक्षित – यात ओव्हरहीटिंग किंवा आग लागण्याचा धोका खूपच कमी असतो.
  3. भारी पण टिकाऊLFP बॅटरी थोडी जड आणि कमी ऊर्जा असली तरी दीर्घकाळ उत्तम कामगिरी करते. ज्या रायडर्सना बॅटरीची टिकाऊपणा महत्त्वाचा वाटतो त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम आहे.

LFP बॅटरी विशेष का आहे?

  1. लांब बॅटरी लाइफ

गेल्या अनेक चक्रांमध्ये LFP बॅटरी हळूहळू क्षमता गमावते, पण ती सातत्याने स्थिर राहते. म्हणजे अनेक वर्षे आणि शेकडो चार्जिंग नंतरही ती आपली ताकद टिकवून ठेवते.
त्याउलट, NMC बॅटरी पटकन क्षमता कमी करू लागते.

  1. ग्राहकांसाठी फायदेशीर
    LFP ची लाइफ आणि चार्जिंग सायकल्स NMC पेक्षा दुप्पट मानली जाते. म्हणजेच ग्राहकांना बॅटरी लवकर बदलावी लागत नाही आणि दीर्घकाळात खर्च कमी होतो.
  2. स्थिर रेंज

NMC बॅटरी सुरुवातीला जास्त रेंज देते पण ती लवकर घसरते. तर LFP बॅटरीची रेंज सुरुवातीला थोडी कमी असते पण नंतर स्थिर राहते.
उदाहरणार्थ, सुझुकी ई-अ‍ॅक्सेस (Suzuki e-ACCESS) मध्ये दिलेली 3.1 kWh बॅटरी 95 किमी रेंज देते. सरासरी भारतीय रायडर दररोज सुमारे 30 किमी चालतो, त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर स्कूटर तीन दिवस चालू शकते.
मजबुती आणि सुरक्षितता-

सुझुकी ई-अ‍ॅक्सेस (Suzuki e-ACCESS) मधील बॅटरी स्कूटरच्या फ्रेममध्ये बसवली आहे आणि ती मजबूत ॲल्युमिनियम केसने झाकलेली आहे. त्यामुळे बाहेरील धक्क्यांपासून ती सुरक्षित राहते आणि आग लागण्याचा धोका कमी होतो.
प्रत्येक ई-अ‍ॅक्सेस (e-ACCESS) स्कूटर आणि तिच्या बॅटरीवर कडक चाचण्या घेतल्या जातात – उष्णता, थंडी, व्हायब्रेशन, पाण्यात डुबवणे, उंचीवरून पडणे अशा अनेक गोष्टींवर तपासलं जातं. यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावरच्या परिस्थितीत बॅटरी अधिक विश्वासार्ह ठरते.
(टीप: हा लेख ब्रँड डेस्ककडून लिहिला गेला आहे. निर्णय घेताना स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा.)