पुष्पा 2 मधील पुष्पराज व श्रीवल्ली यांचे शिक्षण जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित


By Marathi Jagran17, Dec 2024 04:01 PMmarathijagran.com

पुष्पा 2 द रुल

5 डिसेंबर 2024 रोजी रिलीज झालेल्या पुष्पा 2 द रूल या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे या चित्रपटातील कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदांना यांनी आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे आज आपण यांच्या शैक्षणिक करिअर बद्दल जाणून घेणार आहोत.

अल्लू अर्जुन (पुष्पराज)

या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा स्मगलर पुष्पराजची भूमिका साकारली आहे त्याच्या अभिनयाने आणि शैलीने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

रश्मिका मंदाना (श्रीवल्ली)

रश्मिका मंदानाने या चित्रपटाची श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे जी चाहत्यांना खूप आवडली तिच्या निरागसपणाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

अल्लू अर्जुनची पुष्पा 2 मधील फी

अल्लू अर्जुनने पुष्पा 2 द रुलसाठी 300 कोटी रुपये चार्ज केले आहेत या रकमेमुळे त्याचा भारतातील सर्वात ममहागड्या अभिनेत्यांच्या यादीत समावेश झाला.

रश्मिका मंदानाची फी

या चित्रपटासाठी रश्मिका मंदानाने 10 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे हे तिच्या वाढत्या फॅन फॉलोविंगचे लक्षण आहे.

अल्लू अर्जुनचे स्वप्न

अल्लू अर्जुनचे लहानपणापासून अभिनेता बनण्याचे स्वप्न होते त्यांनी चेन्नईच्या सेंट पेट्रिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर हैदराबादच्या एमएसआर कॉलेजमधून बीबीए केले कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

रश्मिकाचा अभिनय प्रवास

रश्मिकाने कुर्क पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि बंगलोरच्या एमएस रामाया कॉलेजमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षणानंतर तिने मॉडलिंगमध्ये प्रवेश केला आणि अभिनयात करिअर केले.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे मनोरंजनाशी संबंधित अशाच इतर बातम्या वाचण्यासाठी जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com

राजकुमार रावच्या या चित्रपटांनी केले बॉक्स ऑफिसवर राज्य