आकडेवारीनुसार मानव सहसा 20 hz आणि 20 हजार hz मधील आवाज ऐकू शकतो यापेक्षा जास्त कोणताही आवाज माणसाला बहिरे बनवू शकतो.
हे तीन प्रकारचे आवाज ऐकले तर कानांसाठी धोकादायक ठरू शकतात ज्याचा आवाज कमी केला पाहिजे जाणून घेऊया या तीन आवाजांबद्दल
जेव्हा तुम्ही तुमची आवडती गाणी एकता तेव्हा आवाज कमी असावा कारण जास्त वेळ मोठ्या आवाजात गाणी ऐकणे तुमच्या कानांसाठी चांगले नसते.
तुमचे कान वाचवण्यासाठी 60% पेक्षा कमी आवाजात संगीत एका आणि हेडफोनचा वापर कमी करा.
तुम्ही ट्राफिक जाममध्ये अडकल्यास खिडक्या बंद ठेवणे किंवा ध्वनिरोधक इयर ब्लॉक वापरणे यासारखी खबरदारी घ्या कारण ट्राफिकचा आवाज 85 डेसिबल पेक्षा जास्त असू शकतो जो सतत ऐकल्यास कानांवर परिणाम होतो.
व्याक्युम क्लिनर, ब्लेंडर आणि हेअर ड्रायर यासारखी घरगुती अनेक घरगुती उपकरणे खूप मोठा आवाज करतात हे आवाज 80 डेसिबल पेक्षा जास्त असू शकतात.
त्यांच्याभोवती जास्त वेळ राहिल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते ही उपकरणे वापरताना अंतर ठेवा किंवा ते वापरताना एअर प्लग वापरा.
रेस्टॉरंट किंवा बार च्या वातावरणातून खूप गोंगाट असतो अशा वातावरणात सतत राहिल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो अशा परिस्थितीत शांत कोपऱ्याची जागा निवडा.