मुंबई सारख्या शहरात घर घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. यंदा मात्र अनेक कलाकारांनी मुंबईत घर घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
अभिनेत्री गिरीजा प्रभूने 24 व्या वर्षी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले. गिरिजाने यंदा मुंबईत घर घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
अभिनेता प्रसाद ओकने देखील यंदा आपल्या घराचे स्वप्न साकार केले आहे. आपल्या घराचे फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केले होते.
अभिनेत्री अमृता खानविलकरने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या नव्या घराची झलक दाखवली. अमृताने यंदा आपल्या घराचे स्वप्न साकार केले.
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मुंबईत नवे घर घेतले, नव्या घरातील मुलीसोबतचे फोटो मधुराणी प्रभुलकरने शेअर करत घराची झलक दाखवली.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी यंदा 2024 मध्ये त्यांच्या नव्या घरात प्रवेश केला. मनोरंजनाशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com