HMPV विषाणूपासून बचावासाठी करा हे उपाय


By Marathi Jagran06, Jan 2025 05:06 PMmarathijagran.com

COVID-19 नंतर, ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा नवीन विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत आहे. याच विषाणूचे रुग्ण देशात देखील आढळले आहे. या विषाणूपासून वबचावाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

HMPV व्हायरस म्हणजे काय?

Human Meta Pneumovirus (HMPV) हा एक विषाणू आहे जो आपल्याला सामान्य सर्दीसारखा वाटतो. जर तुम्हाला याचा त्रास झाला तर तुम्हाला खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एचएमपीव्ही विषाणूची लक्षणे

खोकला आणि ताप ही त्याची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. विषाणूचा प्रभाव गंभीर असेल तर न्यूमोनिया आणि ब्राँकायटिसचा धोका असू शकतो.

HMPV व्हायरस कसा पसरतो?

HMPVएका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी सहज पसरतो. आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊन आपण तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श केला तर आपल्याला देखील संसर्ग होऊ शकतो.

बचावाचे उपाय

आजारी लोकांपासून अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे खूप महत्वाचे आहे. तसेच, आपण आपल्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करणे टाळावे.

कोणत्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे?

लहान मुले, वृद्ध लोक किंवा ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे.

आरोग्याशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा JAGRAN.COM

हिवाळ्यात दहा मिनिटात बनवा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिंक लाडू