पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित तबलावादक झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आहे त्यांना अनेक मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना अमेरिकेतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
झाकीर हुसैन यांचे जवळचे मित्र राकेश चौरसिया यांनी सांगितले की, त्यांना रक्तदाब आणि हृदयाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी जेष्ठ संगीतकार उस्ताद अल्लाह रखा यांच्यापोटी झाला 'लिविंग इन द मटेरियल वर्ल्ड' हा त्यांचा पहिला म्युझिक अल्बम 1973 मध्ये आला होता.
झाकीर हुसैन यांना संगीत विश्वातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.
झाकीर हुसैन यांना आतापर्यंत पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहेत यावर्षी त्यांना 66 व्या ग्रॅमी पुरस्कारमध्ये तीन पुरस्कार मिळाले.
झाकीर हुसैन यांना बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते झाकीर पहिले भारतीय संगीतकार होते ज्यांना व्हाईट हाऊसमध्ये संगीत कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते.
देशातील प्रसिद्ध संगीतकारबद्दल जाणून घेण्यासह मनोरंजनाशी संबंधित अश्याच बातमीसाठी वाचत रहा jagran.com