निवेदिता सराफ आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल.


By Marathi Jagran10, Jan 2025 04:39 PMmarathijagran.com

निवेदिता जोशी-सराफ

निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन सृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटाच्या माध्यमातून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

अभिनय कारकीर्द

निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

अशोक सराफ यांच्याशी लग्न

अभिनेत्री निवेदिता जोशी यांनी 1990 मध्ये अभिनेते अशोक सराफ यांच्याशी घरच्यांचा विरोध पत्करत लग्न केले.

अनिकेत सराफ

निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत नावाचा एका मुलगा आहे. जो व्यवसायाने एक शेफ असून, परदेशी आपले शिक्षण पूर्ण करतोय.

मालिका

निवेदिता सराफ या सध्या अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवत आहे. अंग सुनबाई, भाग्य दिले तू मला, बाबा रिटायर होत आहे या अलीकडच्या मालिका विशेष गाजल्या

चित्रपट

निवेदिता सराफ यांचे काही चित्रपट देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्यामध्ये संगीत मानापमान, फस्कलास दाभाडे या चित्रपटांचा समावेश आहे.

उत्तम कुक

निवेदिता यांना स्वयंपाकाची आवड असून, त्यांनी मराठी कुकिंग शो देखील चालवले आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.

मनोरंजनाशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com

रिंकू राजगुरूचे गाजलेले चित्रपट आणि आगामी प्रोजेक्ट्स: सैराट ते जिजाई!