सैराट चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आज मराठी मनोरंजन सृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते.
एशियन चित्रपट महोत्सवासाठी रिंकू राजगुरूंच्या 'आशा' या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटात रिंकूने आशा सेविकेची भूमिका साकारली आहे. रिंकूच्या इतर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
रिंकूने झिम्मा 2 या चित्रपटात तान्या नावाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर या कलाकरांबरोबर काम केले आहे.
मकरंद माने दिगदर्शित या चित्रपटात रिंकूने राजकीय घराण्यातील मुलीची भूमिका साकारली आहे. रिंकूच्या या चित्रपटाला देखील चांगली प्रसिद्धी मिळाली.
या हिंदी चित्रपटात रिंकूने अमोल पालेकर, बरुण सोबती, फ्लोरा सैनी, इंद्रनील सेनगुप्ता या संख्या मोठ्या कलाकाराबरोबर भूमिका साकारत आपली स्थान कायम केले.
2020 साली प्रदर्शित मेकअप या चित्रपटात रिंकूने एका विशीतील लग्नाळू मुलीची भूमिका साकारली आहे.
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव याबाच्या साढे माढे तीन चित्रपटाच्या सिक्वेल मध्ये रिंकू राजगुरू झळकणार असल्याची चर्चा सुरु होती. चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रिंकूच्या हजेरी या चर्चांना उधाण आले होते.
रिकु राजगुरूच्या आगामी जिजाई या चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात झाली असून, लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जिजाई चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
मनोरंजनाशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com