98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. तारा भवाळकर या साहित्य संमेलनाच्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी इतरही महिलांनी हे पद भूषविले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल
ग्वाल्हेर येथे 1961 साली पार पडलेल्या 43 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होते. कुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता.
1975 साली म्हणजेच जवळपास 15 वर्षांनी म्हणजेच कराड येथे झालेल्या 51 व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होता.
1996 मध्ये 21 वर्षांनी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविले.
इंदूर येथे 2001 मध्ये झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.
2019 मध्ये म्हणजे जवळपास 18 वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. 2019मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
नवी दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.