Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र HSC बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी, जा


By Marathi Jagran05, May 2025 06:21 PMmarathijagran.com

इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा जाहीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, विद्यार्थ्यांसाठी तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% आहे.

कोकण विभाग अव्वल

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (96.74 %) आणि लातूर विभागाचा सर्वात कमी (89.46%) लागला.

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% असून मुलांची 89.51 % आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% ने जास्त आहे. 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल 100 % लागला.

2024 च्या तुलनेत कमी

फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल (91.88%) हा फेब्रुवारी-मार्च 2024 च्या निकालापेक्षा (93.37%) 1.49% ने कमी आहे.

निकालाची इतर माहिती

खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73% आहे. पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65% आहे. नियमित, खाजगी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.16% आहे.

Board Exam Stress:बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाचा स्ट्रेस या 6 मार्गांनी कमी करा