पावसाळा सर्वांनाच आवडतो पण कधी-कधी तो इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी हानिकारक ठरू शकतो.
लॅपटॉपचा विचार केला तर पाण्याचा एक थेंबही मोठे नुकसान करू शकतो म्हणूनच पावसाळ्यात त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे
जर तुमचा लॅपटॉप पावसात भिजला किंवा त्यात पाणी साचले तर घाबरू नका या टिप्सच्या मदतीने त्वरित काळजी घ्या
लॅपटॉप ओला झाल्यास लगेच बंद करा चार्जर आणि यूएसबी डिवाइस काढून तो पूर्णपणे पावर डिस्कनेक्ट करा.
घरी उपलब्ध असलेल्या स्वच्छ आणि कोरडा टॉवेल घ्या आणि लॅपटॉप पुसून घ्या लॅपटॉप वरचा ओलावा काढून टाकणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
लॅपटॉप कोरडा करण्यासाठी एक मोठी हवा बंद बॅग घ्या त्यात भरपूर कच्चे तांदूळ घाला आणि लॅपटॉप 48 तासांसाठी ठेवा तांदूळ ओलावा शोषण्यास प्रभावी आहे
जर तांदूळ उपलब्ध नसेल तर लॅपटॉप वर्तमानपत्रात गुंडाळा वर्तमानपत्र ओलावा शोषणास देखील मदत करते.
घरात असलेल्या टेबल फॅनचा वापर करून लॅपटॉपला चांगली हवा द्या हवा गरम नाही याची खात्री करा
या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉपला पाण्यापासून वाचू शकता अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी वाचत रहा marathijagran.com