फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल जाणून घ्या...


By Marathi Jagran17, Jan 2025 03:33 PMmarathijagran.com

हिंदू संस्कृतीत आपले सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात हे साजरे करण्यामागे प्रत्येकाची वेगळी मान्यता असते. आज आपण फेब्रुवारी मधील सणांबद्दल जाणून घेणार आहोत.

गणेश जयंती

माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाईल, या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

वसंत पंचमी

माघी गणेश जयंती नंतर दुसऱ्याच दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते, या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते.

रथ सप्तमी

फेब्रुवारी 2025 मध्ये रथ सप्तमी 4 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल, या दिवशी सूर्य देवाची विधिवत पूजा केली जाते.

जया एकादशी

जया एकादशी फेब्रुवारी 2025 मध्ये 8 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी श्री कृष्णाची पूजा अर्चना केली जाते.

महाशिवरात्री

वर्ष 2025 मध्ये 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे, या दिवशी देवांचे देव महादेव यांची आराधना केल्याने विशेष फळ प्राप्त होते.

अध्यात्माशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com

नागा साधू बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?