सनातन धर्मात साधुसंतांचे विशेष महत्त्व आहे साधुसंत त्यांच्या हयातीत परमेश्वराची उपासना करतात ऋषीमुनींमध्ये नागा साधूंचा ही समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला नागा साधूशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नागा साधू बनणे सोपे नाही यासाठी अनेक टप्पे पार करावे लागतात पहिला टप्प्यात आखाड्याद्वारे व्यक्तीला नागा साधू बनवले जाते.
दुसरा टप्प्यात नागा साधू बनण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात नागा साधू बनण्यासाठी ब्रह्मचर्य पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
नागा साधू बनण्यासाठी अंदाजे सहा महिने ते एक वर्ष लागू शकतात जेव्हा ते नागा साधू बनतात तेव्हा ते अध्यात्मिक जीवनात प्रवेश करतात आणि स्वतःचे पिंडदान करतात.
नागा साधू भिक्षेत मिळालेले अन्नग्रहण करतात साधूला कोणत्याही दिवशी अन्न मिळाले नाही तर त्यांना अन्ना शिवाय जगावे लागते.
नागा साधू आयुष्यात नेहमी आयुष्यभर कधीही कपडे घालत नाही शरीर झाकण्यासाठी ते राख लावतात झोपण्यासाठी पलंग ही वापरत नाही.
या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/ सामग्री/ घटनेच्या/ अचूकतेची किंवा विश्वसार्हतेची हमीदिलेली नाही अध्यात्मशी संबंधित सर्व मोठ्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com