जे लोक या नवरात्रीचे व्रत पाळत आहे त्यांच्यासाठी घरी कन्या पूजन करण्याची प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत.
कन्या पूजन करण्याची पहिली पायरी म्हणजे नऊ मुली आणि एक मुलगा एकत्र करणे ज्यांना दुर्गा देवीचे स्वरूप समजून पुजले जाते.
आपल्या घरी या नऊ कन्यांचे आगमन झाल्यावर त्यांना पाटावर आदराने बसवा आणि त्यांचे पाय धुवून स्वच्छ पुसून घ्या.
त्यांचे पाय धुतल्यानंतर प्रत्येक मुलीच्या कपाळावर टीका लावा आणि हातावर कलव बांधा.
आता तुम्ही तयार केलेला प्रसाद या मुलींना खायला द्या या प्रसादात प्रामुख्याने हलवा, पुरी आणि चणे यांचा समावेश असावा.
प्रसाद ग्रहण केल्यानंतर या मुलींना भेटवस्तू द्याव्या. यामध्ये तुम्ही पैसे, पर्स ,स्टेशनरी वस्तू किंवा इतरही भेटवस्तू देऊ शकता.
यानंतर प्रत्येक मुलीचे पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
अध्यात्माशी संबंधित अशा सर्व बाबींसाठी वाचत रहा jagran.com