आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांची जाणीव करून देणे हा आहे.
योगा केल्याने शारीरिक स्वास्थ्य तर सुधारतेच पण मानसिक दृष्ट्या ही मजबूत होते सकाळी योगासने करणे अधिक फायदेशीर आहे.
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्या योगासनांविषयी सांगणार आहोत जे केल्याने शरीर दिवसभर ऊर्जावान राहते.
अधोमुख स्वाणासन केल्याने रक्तभिसरण तर सुधारतेच पण त्यामुळे तुमचेच स्नायू ही मजबूत होतात.
पवन मुक्तासन केल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते कारण ते शरीरातील घाण बाहेर काढण्यात मदत करते.
तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता यामुळे तुमचे शरीर उबदार राहते आणि रक्तभिसरणही वाढते.
या आसनाला बालमुद्रा असेही म्हणतात बालासन केल्याने तणाव कमी होतो आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
तज्ञांच्या मते आसनामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि शरीराला नवी ऊर्जा मिळते तसेच पोटातील अवयव मजबूत होतात.