माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल रात्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जागतिक कीर्तीचे अर्थ ते देशाचे पंतप्रधान अशी त्यांची ओळख राहिली आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या काळात 10 वर्षे देशाच्या पंतप्रधान पदी होते. या काळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणून घेऊया या निर्णयांबद्दल...
या कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार दिला, ज्यामुळे पारदर्शकता निर्माण झाली.
आदिवासी समाजाला त्यांचे परंपरागत जमिनीचे हक्क परत मिळवून देण्यासाठी या कायद्याने महत्वाची भूमिका बजावली.
मनमोहन सिंह यांच्या सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला, ज्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला एका वर्षात 100 दिवसांच्या रोजगाराचा अधिकार दिला.
मनमोहन सिंग यांच्या सरकारने 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला.
विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बाधित लोकांना योग्य मोबदला देण्यात यावा, यासाठी हा कायदा तयार करण्यात आला.
या कायद्याद्वारे देशातील दोन तृतीयांश कुटुंबांना परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले.
कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख कायम राहील, अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com