मराठी अभिनेत्रींचा मकर संक्रांती स्पेशल लुक पाहिलात का?


By Marathi Jagran14, Jan 2025 02:54 PMmarathijagran.com

मकर संक्रांती

मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची परंपरा मोठ्या उत्साहाने पाळली जाते. मराठी अभिनेत्रींचे काळ्या वस्त्रातील लुक आज आपण पाहणार आहोत.

छाया कदम

लापता लेडीज फेम अभिनेत्री छाया कदम यांनी मकर संक्रांती स्पेशल लुक करत चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकरने मकर संक्रांति निमित्त तिचा काळ्या रंगाची साडी नेसलेला सुंदर लुक शेअर केला आहे. या लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने मकर संक्रांति निमित्त काळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली असून, फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने काळ्या रंगाची जॉर्जेट साडी परिधान केली आहे. सईने तिच्या सोशल मीडियावर मकर संक्रांति निमित्त तिचा लुक शेअर केला आहे.

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीवने तिच्या सोशल मीडियावरून मकर संक्रांति स्पेशल तिचा लुक शेअर केला आहे. सायलीचा हा सिंम्पल लुक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत तिची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांति ऑस्ट्रेलियात साजरी करत आहे. पूजाने पैठणी साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले आहे.

रिंकू राजगुरू

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचा काळ्या रंगाची साडी परिधान केलेला मकर संक्रांति स्पेशल लुक शेअर केला असून, चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजनाशी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com

निवेदिता सराफ आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल.