लसूण तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या आरोग्यासाठी लसणाची साल देखील वापरू शकता लसणाच्या सालीमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर असतं त्याशिवाय याचा वापर घरातील कामासाठी केला जाऊ शकतो.
लसणाची साल पाण्यात उकडून प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे तुम्हाला आजारांच्या धोकांपासून वाचवते.
लसूण पाकळ्या खोबरेल तेलात लसणाची साल उकडा या तेलाने केसांना मसाज केल्याने केस मजबूत होता आणि टाळूतील कोंडा ही कमी होतो.
लसूणची साल मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावा त्यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि मुरमांची समस्या दूर होईल.
लसणाची साले पाण्यात उकडून थंड करून स्प्रे बाटलीत ठेवा ते झाडांवर शिंपडा. त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव रोखला जातो आणि झाडाला इजा होत नाही.
गरम पाण्यात लसणाची साले टाका आणि त्या पाण्याने सांधे शेकून घ्या यामुळे सांध्यातील वेदनांपासून आराम मिळतो.
सूप किंवा डेकोक्शनमध्ये लसूण साले घाला यामुळे पचनक्रिया सुधारते ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोटात जास्त त्रास होत नाही.
लसणाची साल नारळाच्या तेलात बारीक करून फाटलेल्या कोरड्या ओठांवर लावल्याने ओठ मऊ होतात.
तुम्हीही लसणाच्या सालीचे उत्तम फायदे करून पाहा जीवनशैलीशी संबंधित अशाच इतर बातम्यांसाठी वाचत राहा