उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत आहे, अशा स्थितीत बाहेर पडणे फार कठीण आहे. उष्णतेमुळे लोक बेशुद्ध होतात, खूप ताप येणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा काही खबरदारी पाळायलाच हवी. कडक उन्हातून परतताना कोणत्या गोष्टी करू नये याबाबदल आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
कडक उन्हातून घरी परतल्यावर काही वेळ पंख्याच्या हवेत बसा आणि जेव्हा शरीर सामान्य तापमानात येईल तेव्हा एसी चालवा.
कडक उन्हातून घरी परतले तर लगेच आंघोळ करण्याची चूक करू नका, 10 मिनिट थांबा नंतरच आंघोळ करा.
कडक सूर्यप्रकाशामुळे घसा कोरडा पडतो उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका, पाणी सामान्य टेम्परेचर मध्ये आल्यावरच प्या.
उन्हातून आल्यानंतर शरीराला लगेच थकवा येतो, त्यामुळे थकवा दूर करून विश्रांती घ्या.