या वर्षी, अर्थमंत्र्यांनी सोनेरी रंगाची सुंदर ऑफ-व्हाइट साडी नेसण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासोबत त्यांनी लाल ब्लाउज आणि शाल घातली आहे.
अर्थमंत्र्यांची साडी पद्म पुरस्कार विजेती दुलारी देवी यांनी त्यांच्या मधुबनी भेटीत भेट दिली होती. त्यांनी सीतारामन यांना ही साडी बजेटच्या दिवशी ती घालण्याची विनंती केली होती.
निर्मला सीतारामनने सोनेरी बॉर्डरसह गुलाबी मंगलागिरी सिल्क साडी निवडली, या सोबत त्यांच्या पाहतील लाल रंगाची बजेट स्पेशल बॅग उठून दिसत होती.
अर्थमंत्र्यांनी आशा आणि समृद्धीचे प्रतीक असलेली हिरव्या बॉर्डरसह पिवळी रेशमी साडी नेसली होती.
सीतारामन यांनी भारतीय विणकाम समुदायांना प्रोत्साहन देणारी लाल आणि पांढरी पोचमपल्ली सिल्क साडी निवडली होती.
सीतारामन यांनी ओडिशातील तपकिरी आणि लाल रंगाची बोमकाई साडी परिधान केली, प्रादेशिक कारागिरीचे प्रदर्शन या साडीवर पाहायला मिळाले होते.
बजेट डेसाठी कर्नाटकातील काळ्या कसुती एम्ब्रॉयडरी असलेली लाल रेशमी साडीची त्यांनी निवड केली होती.
अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील कांथा एम्ब्रॉयडरी असलेली निळी टसर सिल्क साडी घातली 2024 च्या बजेट दरम्यान परिधान केली होती.