जेएनएन, मुंबई : नवरात्रीच्या उत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या महाअष्टमीचा उत्सव उद्या २९ सप्टेंबर रोजी देशभरात भक्तिभावाने साजरा करण्यात येईल. या दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूपाची, म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. महाराष्ट्रासह उत्तर भारत, बंगाल, ओडिशा, आसाम आणि गुजरातमध्ये या दिवशी मंदिरांमध्ये आणि घराघरांत विशेष पूजाअर्चा केली जाते.

विशेष पूजा आणि अष्टमी व्रत
महाअष्टमीला देवीची महापूजा, हवन, कुमारी पूजन आणि अष्टमी व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते. अनेक ठिकाणी भक्त स्त्रीशक्तीचे प्रतीक मानून लहान मुलींचे पूजन करून त्यांना भोजन दिले जाते. कुमारी पूजनाचा विधी हा नवरात्रीतील एक प्रमुख सोपस्कार आहे. महाष्टमीच्या या शुभ दिनी तुमच्या प्रियजनांना या संदेशासह शुभेच्छा द्या. 

  •  दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
    मातेचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवोत.
     
  •  या पवित्र दिवशी देवी दुर्गेचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत,
    तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
    दुर्गा अष्टमीच्या मंगल शुभेच्छा!
  •  शौर्य, श्रद्धा आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या
    मातेच्या चरणी प्रार्थना करूया –
    आपले जीवन आनंदमय व यशस्वी होवो.
    दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा!
  •  "जय माता दी"
    या नवरात्रातील अष्टमीच्या पवित्र दिवशी
    देवी दुर्गा तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि सुखाचा वर्षाव करो.
    दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दुर्गा अष्टमीच्या या मंगल प्रसंगी,
    मातेचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंध:कार दूर करून
    ज्ञान, बुद्धी आणि तेजाचा प्रकाश फुलवोत.
    हार्दिक शुभेच्छा!
  •  या शुभ दिवशी देवी दुर्गा तुमचे सर्व दुःख दूर करो,
    आयुष्यात नव्या यशाचे द्वार खुले करो
    आणि सदैव सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करो.
    दुर्गा अष्टमीच्या मंगल शुभेच्छा!
  •  मातेच्या चरणी प्रार्थना करूया –
    संकटांवर मात करण्याची शक्ती,
    जीवनात आनंद आणि समाधान लाभो.
    दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा!
  •  जय भवानी, जय दुर्गा!
    आजच्या दिवशी तुमचे घर समृद्धीने भरून जावो,
    मनःशांती लाभो आणि नवरात्राचे व्रत यशस्वी होवो.
    दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  •  महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीच्या स्वरूपातील
    दुर्गामातेची उपासना तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात
    यश, शांती आणि समाधान देवो.
    अष्टमीच्या शुभेच्छा

    हेही वाचा: Swapna Shastra: शारदीय नवरात्रीत माँ दुर्गेशी संबंधित स्वप्न पडले असेल तर तुम्हाला मिळू शकतात हे शुभ संकेत

    हेही वाचा: Shardiya Navratri 2025:  शारदीय नवरात्रीत हवन कधी करावे? जाणून घ्या योग्य नियम आणि शुभ मुहूर्त