जेएनएन, मुंबई. Janmashtami 2025 Wishes : भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमीचा सण आज देशभरात भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देत असून सोशल मीडियावर "जय श्रीकृष्ण" चा गजर ऐकायला मिळत आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेत्यांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून संदेश प्रसारित करत देशवासीयांना शांतता, समृद्धी आणि आनंद लाभावा, अशी प्रार्थना केली. दरम्यान, मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. महाराष्ट्रात दहीहंडी पथके सज्ज झाली आहेत. बालकृष्णाच्या लीला स्मरणात ठेवून लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भक्त आनंदोत्सव साजरा करत आहेत. तुम्ही देखील या शुभेच्छा संदेशाद्वारे जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणीत करू शकता. 

  • "श्रीकृष्णाच्या गोड बासरीच्या सुरांनी

तुमच्या जीवनात सदैव आनंद आणि समाधान नांदो.

जन्माष्टमीच्या शुभेच्छा!"

  • "कृष्णाच्या लीला, राधेचा प्रेमरस

यांनी सजलेला हा दिवस

तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.

    जय श्रीकृष्ण!"

    • "या पवित्र जन्माष्टमीला

    कृष्णाचे गोड गोड नाव

    तुमच्या प्रत्येक श्वासात गुंजत राहो.

    सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!"

    • "माखनचोर नंदलाल

    आनंदाची गोड भेट घेऊन येवो

    आणि तुमच्या आयुष्याला मंगलमय करो.

    हॅपी जन्माष्टमी!"

    • "कृष्णजन्माचा हा पवित्र उत्सव

    तुमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो.