जेएनएन, नागपूर. Diwali Wishes 2026: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि नव्या आशांचा सण. वर्षभर ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो दिवाळीचा सण आता उत्साहात साजरा केला जात आहे. घराघरांत पणत्या, दिव्यांची रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, फराळाचा सुगंध आणि फटाक्यांची आतषबाजी अशा आनंदी वातावरणात दिवाळीचे स्वागत केले जाते. या खास प्रसंगी कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचीही परंपरा आहे.

दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि आनंद व्यक्त करण्याची एक सुंदर संधी आहे. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश, फोटो आणि आकर्षक ग्रीटिंग्स पाठवून सणाचा आनंद द्विगुणित केला जातो.

तुम्हालाही यंदाच्या दिवाळीत आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा द्यायच्या असतील, तर खालील सुंदर संदेश नक्की पाठवा.

  • दिव्यांचा प्रकाश, आनंदाची बरसात,
    तुमच्या जीवनात सदैव सुखाची पहाट! 
  • नवा प्रकाश, नवी उमेद,
    सुख-समृद्धीची लाभो सदैव साथ!
    शुभ दीपावली!
  • प्रत्येक अंगणात आनंदाचा दिवा,
    प्रत्येक मनात प्रेमाचा ठेवा!
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 
  • दुःख दूर होवो, सुख जवळ येवो,
    प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो!
    शुभ दीपावली! 
  • लखलखत्या दिव्यांसोबत,
    आयुष्यही आनंदाने उजळून जावो!
    शुभ दीपावली! 
  • हास्य असो ओठांवर,
    समाधान असो मनात,
    समृद्धी नांदो सदैव,
    तुमच्या जीवनात! 
  • दिवाळीचा सण घेऊन येवो,
    सुख, शांती आणि भरभराट,
    प्रत्येक दिवस असो खास,
    आनंदाची लाभो साथ! 
  • तेजोमय होवो जीवन,
    समृद्ध होवो प्रत्येक क्षण!
    दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 
  • दिव्यांचा प्रकाश आणि नात्यांचा गोडवा,
    हीच असो आपल्या दिवाळीची खरी श्रीमंती! 
  • आनंदाचे दीप उजळू दे,
    सुखाचे क्षण फुलू दे,
    प्रत्येकाच्या आयुष्यात
    समृद्धीचे पर्व येऊ दे! 
  • नवी स्वप्ने, नवी आशा,
    नव्या यशाची नवी दिशा!
    शुभ दीपावली

    प्रकाशाचा सण, आनंदाचा क्षण
    सर्वांना लाभो सुखी जीवन!