जेएनएन, मुंबई: जगभरात लाखो-करोडोंच्या संख्येत पुस्तके आहेत आणि वाचकांची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे. दरवर्षी कोट्यावधी पुस्तके प्रकाशित होत असतात. तरीही पुस्तकांना त्यांचा वाचक मिळत नाही अशी तक्रार लेखक आणि पुस्तक विक्रेत्यांकडून केली जाते. आजच्या युगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे पुस्तक वाचकांची संख्या कमी झाली आहे मात्र, तितकेच खरे आहे. आज अनेक गॅझेट प्रत्येकाच्या हातात उपलब्ध आहे. आणि या आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून वाचनाची आवड असणारे काही ना काही वाचत असतात.

आजच्या 21 व्या शतकात अनेक प्रकारची माध्यमे उपलब्ध असली तरीही, 90 च्या दशकात केवळ प्रकाशित झालेली पुस्तके आणि वर्तमानपत्रातून प्रकाशित होणारे लेख हेच वाचनाचे माध्यम असायचे. 90 च्या दशकात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले जनजागृती केली गेली. याच काळात अनेक ग्रंथालय देखील वाचकाच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आले. परंतु, आताची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या वाचकांना त्यांचं वाचनाचे छंद जोपासण्यासाठी केवळ प्रकाशित पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत नाही. आणि त्यामुळेच की, काय वाचकांची संख्या कमी असल्याचे बोलले जाते.

म्हणून 23  एप्रिलला साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन
जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक कॉपीराइट दिवस हा संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी UNESCO ने हा दिवस साजरा करायला 1995 मध्ये सुरवात केली. आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे. पहिला जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 1995 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. असेही सांगितले जाते की, पहिला पुस्तक दिवस हा 7 ऑक्टोबर 1926 रोजी साजरा करण्यात आला होता. 1922 मध्ये र्सिलोना येथील सर्व्हेन्टेस प्रकाशन गृहाचे संचालक व्हिसेंट क्लेव्हल यांनी लेखक मिगुएल डी सर्व्हंटेस यांचा सन्मान करण्यासाठी आणि पुस्तकांच्या विक्रीला चालना देण्यासाठी  ही संकल्पना समोर आणली होती. त्यांनतर मात्र 1995 मध्ये युनेस्कोने निर्णय घेतला की, जागतिक पुस्तक दिवस हा 23 एप्रिल म्हणजेच विल्यम शेक्सपियर आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा यांच्या पुण्यतिथी निमित्त साजरी केली जाईल.

जगभरातील प्रसिद्ध दहा लायब्ररी

  1. युनायटेड किंगडम मधील ब्रिटिश लायब्ररीचा पहिला क्रमांक येतो या लायब्ररीमध्ये 170 ते 200 दशलक्ष पुस्तकांची संख्या असून दरवर्षी येथे एक लाख 75 दशलक्ष वाचक भेटी देतात. या लायब्ररीत 1977 कर्मचारी कार्यरत आहेत.
  2. या क्रमांकात वॉशिंग्टन डीसी मधील काँग्रेसचे ग्रंथालय हे दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे 175 दशलक्ष पुस्तकांची संख्या आहे. तर दरवर्षी 1.9 दशलक्ष वाचक या लायब्ररीला भेट देत असतात. या लायब्ररीमध्ये  3149 कर्मचारी कार्यरत आहेत.
  3. चीनमधील शांघाय लायब्ररी ही तिसऱ्या क्रमांकावर असून येथे 57 दशलक्ष पुस्तके उपलब्ध आहेत.  
  4. संयुक्त राष्ट्र निर्यात शहर मधील न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी मध्ये 55 दशलक्ष पुस्तके असून दरवर्षी 18 दशलक्ष वाचक या लायब्ररीला भेट देत असतात. तर 3000 कर्मचारी या लायब्ररीत कार्यरत आहेत.  
  5. कॅनडामधील ओटावा या ठिकाणी असलेली लायब्ररी आर्काईज कॅनडा मध्ये 54 दशलक्ष पुस्तके असून या लायब्ररीत 874 कर्मचारी कार्यरत आहेत.  
  6. रशियामधील मॉस्को शहरात असलेली रशियन राज्य ग्रंथालय मध्ये 48.1 दशलक्ष पुस्तकांची संख्या असून, दरवर्षी चार लाख 98 हजार वाचक या लायब्ररीला भेट देत असतात.  तर 1613 कर्मचारी येथे कार्यरत आहेत.  
  7. जापान मधल्या टोकियो आणि क्युटो शहरात असलेल्या राष्ट्रीय आहार ग्रंथालय मध्ये 44.1 दशलक्ष इतकी पुस्तकांची संख्या असून दरवर्षी सात लाख 91 हजार 370 वाचक भेट देत असतात तर, या लायब्ररीत 908 कर्मचारी कार्यरत आहेत.  
  8. जर्मन मधील फ्रांक फ्रंट येथील जर्मन राष्ट्रीय ग्रंथालय मध्ये 43.7 दशलक्ष पुस्तकांची संख्या असून येथे तीन लाख 50 हजार 713 वाचक दरवर्षी भेटी देत असतात, तर या ग्रंथालयात 639 कर्मचारी कार्यरत आहेत.
  9. डेन्मार्क येथील कोपन हे गण येथे असलेल्या रॉयल डॅनिश लायब्ररीमध्ये 42.5 दशलक्ष इतकी पुस्तके असून दरवर्षी 1.45 लाख वाचक भेटी देत असतात तर या लायब्ररीत 800 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत
  10. जगातील प्रसिद्ध लायब्ररींच्या यादीत दहावा क्रमांक येतो तो म्हणजे चीनमधील बीजिंग शहरात असलेल्या चीन राष्ट्रीय ग्रंथालयाचा येथे 43.27 दशलक्ष पुस्तकांची संख्या असून दरवर्षी या ग्रंथालयात 5.2 दशलक्ष वाचक भेट देत असतात तसेच या ग्रंथालयात 1365 कर्मचारी कार्यरत आहेत.