जेएनएन, मुंबई: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो (IndiGo) एअरलाईनमध्ये मोठे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय आव्हान उभे राहिले. कंपनीने देशभरातील सुमारे 200 देशांतर्गत उड्डाणे रद्द केली, तसेच अनेक फ्लाइट्स मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. या अचानक बदलांमुळे हजारो प्रवाशांचे नियोजन कोलमडले असून अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण
देशातील अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) काळपासूनच प्रचंड गर्दी जमा झाली आहे.

फ्लाइट रद्द झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढली
चेक-इन काउंटरवर मोठ्या रांगा लागले आहे.माहिती वेळेवर न मिळाल्याने प्रवाशांचा संताप वाढला आहे.प्रवाशांनी “अव्यवस्थापन" असल्याचा आरोप केला आहे.एका प्रवाशाने सांगितल आम्हाला फ्लाइट रद्द झाल्याची माहिती शेवटच्या क्षणी दिली जात आहे. पर्याय ही दिला नाही. संपूर्ण प्रवासाचा नियोजन  बिघडलेआहे.

इंडिगोकडून निवेदन
प्रवाशांच्या तक्रारी वाढताच इंडिगोने एक अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की खालील कारणांमुळे उड्डाणे प्रभावित झाली आहेत:

पायलट आणि क्रूची कमतरता

काही विमानांमध्ये तांत्रिक बिघाड

    काही विमानतळांवरील अति गर्दी व ऑपरेशनल आव्हाने

    अनपेक्षित शेड्यूलिंग समस्या

    कंपनीचे म्हणणे आहे की  “आम्हाला प्रवाशांची झालेली गैरसोय मान्य आहे. यासाठी आम्ही मनापासून माफी मागत आहे. उड्डाण सुरळीत करण्यासाठी आम्ही पुन्हा नियोजन करत आहोत.”

    प्रवाशांचा रोष
    उड्डाण रद्द करण्याबाबत तातडीने पुरेशी माहिती न दिल्याने प्रवाशांनी सोशल मीडियावर कंपनीवर टीका केली आहे.काहींनी रद्द झालेल्या उड्डाणांचे फोटो पोस्ट केले आहे तर काहींनी पर्यायी फ्लाइट न मिळाल्याची तक्रार केली आहे.परतावा मिळण्यासही विलंब होत असल्याचे आरोप केला आहे.

    हेही वाचा: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी 13 CR गाड्यांमध्ये सुरु होईल OTP-आधारित प्रमाणीकरण

    हेही वाचा: तरुणाचा आत्मा.. एम.ए.बी.एड. सायको किलर महिलेने पोटच्या मुलासह 4 मुलांची केली हत्या, कारण ऐकून पोलीसही चक्रावले