डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. देशातील 7 सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO's Tentative World Heritage List) समाविष्ट झाली आहेत. यामध्ये पाचगणीचे डेक्कन ट्रॅप्स, महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि आंध्र प्रदेशातील तिरुमाला हिल्सच्या नावांचाही समावेश आहे.
युनेस्कोमधील भारताच्या स्थायी शिष्टमंडळानुसार, ही 7 वारसा स्थळे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. यासोबतच युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्थळांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
7 राज्यांमधील 7 ठिकाणे समाविष्ट
इंडिया ॲट युनेस्कोने (India at UNESCO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पोस्ट शेअर करत लिहिले, "युनेस्कोमधील भारताच्या स्थायी शिष्टमंडळाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारतातील 7 ठिकाणांचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे."
क्रमांक | ठिकाण | राज्य |
1 | पाचगणीचे डेक्कन ट्रॅप आणि महाबळेश्वर | महाराष्ट्र |
2 | मेघालयातील गुहा (पूर्व खासी हिल्स) | मेघालय |
3 | नागा हिल्स ओफिओलाइट | किफायर, नागालँड |
4 | तिरुमाला हिल्स | तिरुपती, आंध्र प्रदेश |
5 | वर्कला | केरळ |
6 | येरा मट्टी डिब्बालु | विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश |
7 | सेंट मेरी आयलंड क्लस्टर | उडुपी, कर्नाटक |