जेएनएन, नागपूर: संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या श्रींची पालखी दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशी साठी पायी वारी जात असते. या पालखी सोबत विठ्ठल व संत गजानन महाराजांचे लाखो भक्त शेगाववरून पंढरपुरात दाखल होत असतात. यंदा 56 व्या वर्षी देखील ही पायी वारी आयोजित करण्यात आली असून, यासाठी संत गजानन महाराजांची पालखी २ जून रोजी  शेगाववरून पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. 

दिनांक 02 जून 2025 (सोमवार) रोजी श्री मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पायी वारीचा प्रस्थान व परतीचा मार्ग पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. वारी दरम्यान पंढरपूर मुक्काम 04  जुलै ते 09 जुलै 2025  दरम्यान राहणार आहे. त्यानंतर 10 जुलै 2025 पासून पालखी परतीच्या मार्गाने शेगावकडे प्रयाण करेल. वारी दरम्यान विविध गावांमध्ये मुक्काम असून, हजारो भाविक भक्त या वारीमध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा:पंढरीत भरणार वैकुंठीचा मेळा; आषाढी एकादशीसाठी या दिवशी निघणार मानाच्या पालख्या, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

खाली श्री गजानन महाराज पालखी वारी 2025  चे प्रस्थान वेळापत्रक (शेगाव ते पंढरपूर) तक्त्यात सुसंगतपणे मांडले आहे:

दिनांकवारतिथीदुपारी (कि.मी.)रात्री (कि.मी.)मुक्काम
०२-०६-२०२५सोमवारज्येष्ठ शु. ७--श्री मंदिर, शेगाव (प्रस्थान)
१९-०६-२०२५गुरुवारज्येष्ठ व. ८२२०६वडगाव (दादा हरी)
२०-०६-२०२५शुक्रवारज्येष्ठ व. ९०३०२परळी
२१-०६-२०२५शनिवारज्येष्ठ व. १०/११०६२०अंबाजोगाई
२२-०६-२०२५रविवारज्येष्ठ व. १२ (एकादशी)११११पारस
२३-०६-२०२५सोमवारज्येष्ठ व. १३१८१०कळंब
२४-०६-२०२५मंगळवारज्येष्ठ व. १४१९१०तेरणा साखर कारखाना
२५-०६-२०२५बुधवारज्येष्ठ व. ३०२१०५उपळा (माकडाचे)
२६-०६-२०२५गुरुवारआषाढ शु. १०९०७धाराशिव
२७-०६-२०२५शुक्रवारआषाढ शु. २१११७तुळजापूर
२८-०६-२०२५शनिवारआषाढ शु. ३०८२४ऊळे
२९-०६-२०२५रविवारआषाढ शु. ४१६०७सोलापूर
३०-०६-२०२५सोमवारआषाढ शु. ५०३०३सोलापूर
०१-०७-२०२५मंगळवारआषाढ शु. ६०३१२तिन्हे
०२-०७-२०२५बुधवारआषाढ शु. ७०७२१माचणूर
०३-०७-२०२५गुरुवारआषाढ शु. ८०२१४मंगळवेढा
०४-०७-२०२५शुक्रवारआषाढ शु. ९०३२४पंढरपूर (मुक्काम)