जेएनएन, नागपूर.Pandharpur Special Railway: पंढरपूर येथे  6 जुलै 2025 रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने नागपूर, मिरज, पुणे व लातूर दरम्यान अनेक विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यात्रेकरूंच्या प्रवासाची सुविधा आणि गर्दीचे व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

नागपूर – मिरज विशेष गाड्या (गाडी क्र. 01205 / 01206)
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) योजनेअंतर्गत नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या 1.3 भाडे दर योजनेतून संचलित केल्या जातील.

गाडी क्र. 01205 (नागपूर – मिरज विशेष)
प्रस्थान: 4 व 5 जुलै 2025  रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूर

आगमन: दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरज

गाडी क्र. 01206 (मिरज – नागपूर विशेष)
प्रस्थान: 6 व 7 जुलै 2025 रोजी दुपारी 12.25 वाजता मिरज

आगमन: दुसऱ्या दिवशी दुपारी 12.55 वाजता नागपूर

    थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठे महांकाळ आदी.

    कोच रचना: 10 शयनयान, 4 सामान्य, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे व 2 गार्ड-कम-लगेज डबे; एकूण 18 डबे.

    पुणे – मिरज विशेष (गाडी क्र. 01413)
    ही विशेष गाडी 8 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पुणे स्थानकावरून निघून दुपारी 12.30 पर्यंत मिरजला पोहोचेल.

    मार्ग: लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली

    मिरज – नागपूर विशेष (गाडी क्र. 01213)
    ही एकेरी विशेष गाडी 8 जुलै रोजी दुपारी 12.55  वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता नागपूरला पोहोचेल.

    महत्त्वाचे थांबे: पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, मनमाड, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव आदी.

    मिरज – लातूर विशेष (गाडी क्र. 01409)
    जुलै रोजी सकाळी 9 वाजता मिरज स्थानकावरून निघून, रात्री 7.20 वाजता लातूर स्थानकात पोहोचणारी एकेरी अनारक्षित गाडी.

    थांबे: पंढरपूर, कुडूवाडी, बार्शी, धाराशिव, कळंब, ढोकी, मुरुड, औसा रस्ता, हरंगुळ

    रेल्वे प्रशासनाकडून यात्रेकरूंना वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. IRCTC च्या संकेतस्थळावर तसेच जवळच्या आरक्षण केंद्रांवर तिकिटे उपलब्ध आहेत. भाविकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करून या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    हेही वाचा:Ashadhi Ekadashi 2025 साठी 5200 विशेष बसेस अन् 4 बसस्थानक, तुमच्या जिल्ह्यासाठी कुठून मिळेल बस? वाचा सविस्तर