जेएनएन, मुंबई: Zilla Parishad 2026 Voting Highlights: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125पंचायत समित्यांसाठी आज, 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांसाठीही मतदान होत असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तासह शांततेत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
- 2026-02-07 19:28:29
राज्यात 03.30 पर्यंत 52.02 टक्के मतदान
राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज सकाळी 7.30 ते 03.30 या कालावधीत 52.02 टक्के मतदान झाले आहे.
- 2026-02-07 15:45:00
1.30 पर्यंत 37.94 टक्के मतदान
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दुपारी 1.30 पर्यंत 37.94 टक्के मतदान झाले. - 2026-02-07 15:00:52
सकाळी 11.30 पर्यंत 22.26 टक्के मतदान
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी 11.30 पर्यंत 22.26 टक्के मतदान झाले. - 2026-02-07 14:07:08
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भरणेवाडीतील बोराटवाडी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान करत लोकशाही प्रक्रियेचा आदर्श ठेवला.
- 2026-02-07 14:04:56
आमच्या संपूर्ण निवडणूक प्रचारात फक्त 'जय श्रीराम'च्या घोषणा आणि भगवे झेंडे - रितू तावडे
मुंबई, महाराष्ट्र: भाजपच्या मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणतात, "...तुम्ही निवडणुकीदरम्यान पाहिले असेलच, ते हिरवे झेंडे फडकावत होते, तर आमच्या संपूर्ण निवडणूक प्रचारात फक्त 'जय श्रीराम'च्या घोषणा आणि भगवे झेंडे होते."Mumbai, Maharashtra: BJP Mumbai mayor candidate Ritu Tawde says, "...If you observed during the election, you saw them waving green flags, whereas our entire election campaign had only chants of 'Jai Shri Ram' and saffron flags" pic.twitter.com/j3nFANNEkI
— IANS (@ians_india) February 7, 2026 - 2026-02-07 13:45:20
44 वर्षांनंतर बीएमसीमध्ये भाजपचा महापौर पदभार स्वीकारणार
भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम म्हणतात, "44 वर्षांनंतर बीएमसीमध्ये भाजपचा महापौर पदभार स्वीकारणार आहे. शहराचा विकास करणे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे आणि मुंबईची सुरक्षा राखणे हे आमचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे..."Mumbai, Maharashtra: BJP Mumbai President Ameet Satam says, "After 44 years, a BJP Mayor is set to take office in the BMC. Our foremost duty is to ensure the city’s development, provide corruption-free administration, and maintain Mumbai’s safety..." pic.twitter.com/XGZBziyle5
— IANS (@ians_india) February 7, 2026 - 2026-02-07 12:34:18
राज्यात सकाळी 9.30 पर्यंत 7.80 टक्के मतदान
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी 9.30 पर्यंत 7.80 टक्के मतदान झाले. - 2026-02-07 12:11:38
भाजपच्या रितू तावडे यांनी महापौर पदासाठी दाखल केला अर्ज
भाजपच्या रितू तावडे आणि शिवसेनेचे संजय घाडी यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले.मुंबई: बीजेपी की रितु तावड़े और शिवसेना के संजय घाड़ी ने क्रमशः मेयर और डिप्टी मेयर के पद के लिए अपना नॉमिनेशन फाइल किया। pic.twitter.com/Pg2duR3mHF
— IANS Hindi (@IANSKhabar) February 7, 2026 - 2026-02-07 12:09:18
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेविका रितू तावडे यांना उमेदवारी
भाजपने मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेविका रितू तावडे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांना नामांकित केले आहे. - 2026-02-07 11:15:00
Raigad ZP Election 2026: रायगड जिल्ह्यात 11.2% मतदान पार पडले.
रायगड जिल्ह्यात आज सकाळी 9.30 पर्यंत 11.2% मतदान पार पडले. जिल्हा परिषद निवणुकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. Raigad ZP Election 2026: गोगावले कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
महाड येथील खरवली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी मतदानाचा हक्क बजावला. विकास गोगावले यांनी वडील मंत्री भरत गोगावले आणि आई सुषमा गोगावले त्यासोबतच पत्नी आणि बहीण यांच्यासह मतदान केलं.- 2026-02-07 09:20:00
Latur ZP Election 2026: लातूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार समोर
लातूर जिल्ह्यातील तांबळा जिल्हा परिषद गटातील एका मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका उमेदवाराने मतदान करतानाचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Solapur ZP Elecion 2026: अकलूज येथे बंद पडले मशीन
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील एका केंद्रावर चुकीचे बटन दाबल्यामुळे मशीन बंद पडले, त्यामुळे मतदारांना रांगेत बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.- 2026-02-07 07:55:00
Baramati ZP Election 2026: सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
बारामती जिल्हा परिषदेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी मतदान केले. सुनेत्रा पवार यांनी सकाळी बारामतीमधील काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला - 2026-02-07 07:33:00
Zilla Parishad 2026 Voting Live:
राज्यातील 12 जिल्हा परिषदांमधील ७३१ जागांसाठी एकूण 2,624 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 125 पंचायत समित्यांतील 1,462 जागांसाठी 4,814 इच्छुक निवडणूक लढवत आहेत. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळत असून प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही जोरदार प्रचार केला होता.
